अध्यात्मिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरवले
पंढरपूर- वेदांताचे अभ्यासक व संत साहित्याचे लेखक पांडुरंग गणेश तथा बाळशास्त्री हरिदास (वय-92) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.
श्री विठ्ठलाचे सेवाधारी असणाऱ्या बाळशास्त्री हरिदास यांनी पन्नास वर्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कीर्तन तसेच देवाच्या नित्य उपचारामध्ये सेवा बजावली होती. येथील नगर वाचन मंदिर, आपटे उपलब्ध प्रशाला, याज्ञवल्यक आश्रम या संस्थेचे ते विश्वस्त होते. वैकुंठ स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा