शाळेतील शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांच्या वतीने अर्चना अधाने यांचे अभिनंदन
शिवशाही वृत्तसेवा, सोयगाव (तालुका प्रतिनिधी रईस शेख)
खुलताबाद तालुक्यातील गदाना येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय समितीच्या अध्यक्षपदी अर्चना अशोक अधाने यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शाळेच्या विकास कार्यांना नवा चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. अर्चना अधाने या नेहमीच शिक्षण क्षेत्रात सक्रिय राहिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या विकासासाठी अनेक नवीन उपक्रम राबवले जातील. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि शाळेच्या सुविधांच्या सुधारण्यासाठी त्या कटिबद्ध राहतील. शालेय समितीच्या या निवडीबद्दल शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक वर्गात आनंदाचे वातावरण आहे. सर्वांनी अर्चना अधाने यांचे अभिनंदन केले आहे आणि त्यांच्या आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी बोलताना अर्चना अधाने यांनी सर्वांचे आभार मानले आणि शाळेच्या विकासासाठी सर्वोत्तम प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले अध्यक्षपदी त्यांच्या निवडीमुळे शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी दिशा मिळेल याची आशा आहे.यावेळी उपस्थित गावचे सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व माजी शालेय समिती यांची उपस्थिती होती, यावेळी पोपट चव्हाण , कैलास बडूगे, राजू चव्हाण, काकासाहेब अधाने , वैजनाथ अधाणे, मधुकर खाडे, कचरू वाघ, नवनाथ कुकलारे, निलेश बिरसने, योगेश पंडित,साहेबराव चव्हाण,ज्ञानेश्वरी कुकलारे, लाला खाडे, गणेश चव्हाण, राजू बिरसने, अशोक अधाने आदींची उपस्थिती होती.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा