दादा पाटील फराटे यांचा आमदार अशोक पवार यांना सवाल
शिवशाही वृत्तसेवा शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादी चे नेते दादा पाटील फराटे यांनी शिरूर येथे पत्रकार परिषद घेऊन राजकीय घडामोडींवर भाष्य करत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांच्या राजकारणातील अनेक आठवणींना उजाळा देत, आपण आत्तापर्यंत फक्त आणि फक्त संघर्ष केलेला आहे, त्याबद्दल आपल्याला काहीही भेटलेले नाही व आपणास ती इच्छा ही नाही. आज पर्यंत तीन वेळा विधानसभेची निवडणूक मा.आमदार कै. बाबुराव पाचर्णे यांच्यासाठी पूर्ण ताकदीने उभे राहून लढवली आहे.
त्यामुळे शिरूर मधील ६१ व हवेली मधील ४१ गावे नाही, तर या गावातील सर्व जनता मला ओळखते व त्यांना ओळखतो, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्या साठी, त्यांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांसाठी, सरकारी असणाऱ्या अनेक योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी, संपूर्ण शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना होणाऱ्या पाण्याचे आवर्तन वेळेत होण्यासाठी, अनेक अपूर्ण रस्ते व कायम भेडसावणारा वाघोली ते शिरूर वाहतूक प्रश्नासाठी मला ही आमदारकी लढवायची आहे व त्यात जनतेचा कौल माझ्याच बाजूने आहे ,म्हणून मी अजित दादा पवार यांच्याकडे दावेदार म्हणुन उमेदवारी मिळावी असे सांगितले आहे.
घोडगांगा साखर कारखाना विषयी बोलताना , फराटे यांनी घोडगांगा साखर कारखाना बंद पडण्याचे कारण ,म्हणजे फक्त आमदार अशोक बापू पवार आहेत, त्यांनी उत्तर द्यावे, कारखाना चालू असतानाही कसा काय कर्जात गेला, त्यांचा खासगी कारखाना आजही व्यवस्थित चालु आहे व आता कर्ज मागून कारखाना चालू करण्यासाठी फाईल दिली आहे ,त्यात त्रुटी निघाल्या, तर त्या वेळेत का पूर्ण केल्या नाहीत या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. कोणतेही कर्जाचे फाईल तोंड पाहून नाही तर कागदपत्रे व काम पाहून पास होते. कारखाना कर्जाच्या ओझ्याखाली जाऊन बंद पडण्यासाठी अजित दादा पवार हे कारणीभूत नसून फक्त आमदार अशोक बापू पवार आहेत .त्यांचा खासगी कारखाना आजही जोमात चालू आहे. विशेष बाब म्हणजे घोडगंगा कारखान्यावरील कामगारांचे पगार थकले व त्यातही विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे, आपल्यातील एखादा कामगार मरण पावला तर एक दिवसाचा पगार प्रत्येक कामगार त्या मृत कामगारास देतो, आज पर्यंत तोही कामगारांचे चार ते पाच वर्षश्राद्ध होऊनही मिळालेला नाही ,असे का? तो तर कोणी स्वतः देत नव्हते कामगार कामगारांसाठी देत असतानाही त्यांना मिळालेला नाही, मग तो पैसा कुठे गेला? आज पर्यंत मृत कामगारांच्या वारसाचीही नोंद झालेली नाही. मग या सर्व बाबींसाठी कोण जबाबदार? कारखाना स्थापनेपासून ते मागील वर्षी कारखाना बंद पडेपर्यंत एक हाती कारखान्याची सत्ता पवार कुटुंबांकडे असतानाही, कारखाना तोट्यात जाणे म्हणजे काय?
घोडगंगा साखर कारखान्याच्या पाठीमागून, नवीन उदयास येणारे अनेक साखर कारखाने आज नफ्यात चालू आहेत .कारण कारखान्यासाठी लागणारा कच्चामाल कारखान्याचा आसपास तयार होतो व लगेच उपलब्ध होतो,म्हणून साखर कारखाने फायद्यात असतात. फक्त घोडगंगा वगळता. जनतेचा सेवेकरी म्हणुन मला ही आमदारकी लढवायची आहे, असे ठाम मत त्यांनी, शिरूर येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा