राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांचे शुभहस्ते विजय कदम यांचा सत्कार
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर ज़िल्हा प्रतिनिधी हुसेन मुलानी
पंढरपूर प्रतिनिधी दि.23- महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे सोलापूर विभागाच्या संचालक पदी भंडीशेगांव, ता.पंढरपूर येथील उपसरपंच व प्रगतशिल शेतकरी विजय कदम यांची पुनश्च निवड झालेबददल सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांचे शुभहस्ते वसंतबाग आढीव या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कल्याणराव काळे म्हणाले की, बाहेरगावावरुन येवून भंडीशेगांव ता.पंढरपूर या ठिकाणी स्थायिक असणारे श्री कदम हे स्वत:च्या शेतामध्ये द्राक्ष पिकांवर विविध प्रयोग करुन अल्प पाण्यामध्ये तसेच कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसे घेता येईल याचे सातत्याने ते प्रयत्न करीत असतात. त्यांच्या कामाबरोबर भागातील इतरही शेतकऱ्यांना ते द्राक्ष पिकांबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करीत असून अल्प जमीन असवणाऱ्या शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन कसे वाढवता येईल याचे मार्गदर्शन केल्यामुळे तालुक्यातील बहुतांष शेतकऱ्यांची आर्थिक घडी बसविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे असेही काळे यांनी सांगीतले.
या सत्कार समारंभास प्रगतशिल द्राक्ष बागायतदार चंद्रकांत कोळवले व त्यांचे सहकारी, तसेच वसंतबागचे व्यवस्थापक शहाजी काळे, देवानंद वाघमारे यांचेसह कर्मचारी उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा