सध्या प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडी , राजकारण असो वा समाजकारण
शिवशाही वृतसेवा, सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी, आरिफ शेख
राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या तालुक्यात बुलढाणा जिल्ह्यातून पहिल्यांदा वरोडी येथे महिलेची तंटामुक्ती अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
महिला त्या पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून आज प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करताना दिसत आहे,मग ते राजकारण असो किंवा समाजकारण असो किंवा नोकरीमध्ये असो प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला काम करताना दिसत आहे, अनेक क्षेत्रांमध्ये उदाहरणार्थ अनेक गावांमध्ये अनेक महिला सरपंच पदावर विराजमान आहे पोलीस पाटील सुद्धा महिला काम करताना दिसत आहे ग्रामसेवक सुद्धा महिलाच आहे ग्रामीण भागात पोस्टमन या पदावर महिलाच कार्यरत आहे काही अपवाद वगळता महिलाच काम करताना दिसत आहे, अनेक ठिकाणी महिलांना सन्मानाची वागणूक मिळत आहे चांगले पद सुद्धा त्यांना दिल्या जात आहे असेच कार्य वरोडी सिंदखेडराजा तालुक्यातील प . पू .तेजस्वी महाराज यांच्या पावनभूमीने नावलौकिक असलेल्या वरोडी
येथे दि . २६ ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते सदर ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंचा सौ अन्नपूर्णा सुधाकर गारोळे ह्या होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून सचिव सरला गावडे ,ग्रामपंचायत सदस्य सुधाकर पुंजाजी गारोळे माजी उपसरपंच सुमेध गवई,तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप खरात कृषी सहाय्यक पाचरणे,यांचे प्रमुख उपस्थिती होती,सुरुवातीला तंटामुक्ती अध्यक्ष पदाकरता अनेकांनी अर्ज दाखल केले होते परंतु पहिल्यांदा तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी महिलेला संधी दिली पाहिजे अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण होऊन अनेकांनी अर्ज मागे घेतले व बुलढाणा जिल्ह्यातून पहिल्यांदा वरुडी गावांमधून सौ रंजना भास्कर गारोळे यांची बिनविरोध तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड करण्यात आली, त्यांची निवड होताच पोलीस पाटील सुनील गारोळे,भास्कर महाराज गारोळे,गौतम वानखेडे आदिनाथ गारोळे भागवत गुंजकर मनोहर गारोळे,दिलीप गवई ठेकेदार मिलिंद मोरे ,यांनी नवनिर्वाचित महिला तंटामुक्ती अध्यक्ष यांचे स्वागत केलं,पहिल्यांदा तंटामुक्तीच्या अध्यक्षपदाकरता महिलेची निवड करण्यात आली असून इतर गावांनी वरुडी गावचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे,सदर ग्रामसभेला बीट जमदार संदीप सुरडकर यांनी खडक बंदोबस्त ठेवला होता,
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा