प्रशासनाचा ही कानाडोळा
शिवशाही वृतसेवा, पारनेर जिल्हा प्रतिनिधी, सुदाम दरेकर
पळवे खुर्द मठ वस्ती ते घाणेगाव या रस्त्याची नेहमी चालू असलेल्या पावसामुळे पूर्ण वाट लागली आहे. त्यामुळे या रस्त्याने पायाने प्रवास करणे हे फार मुश्किल झाले आहे हा रस्ता पूर्ण दोन किलोमीटर खराब झाला आहे तसेच या रस्त्या लगत जिल्हा परिषदेची शाळा आहे त्यामुळे या चिमुकल्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तसेच या रस्त्यालगत व्यंकटेश प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे या कंपनीच्या वाहनांची नेहमी ये जा चालूच असते.
या कंपनीने सेस फंडातून हा रस्ता करणे गरजेचे होते. परंतु घाणेगाव तसेच पळवे खुर्द ग्रामस्थांनी तक्रार करून देखील कंपनी तसेच प्रशासन या रस्त्याचा विचार करत नाही. या रस्त्यालगत अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. त्यामुळे जनावरांचा चारा तसेच दूध वाहतूक करण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे. तसेच हा रस्ता गटेवाडी कडेही जातो आहे त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याचा प्रशासनाने विचार करून दुरुस्त करून देण्याची मागणी पळवे खुर्द मठ वस्ती येथील ग्रामस्थांनी केली आहे..
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा