२६ मोटारसाकल धारकाकडुन एकुण दंड १६००० रुपये दंड वसुल
शिवशाही वृतसेवा, तालुका प्रतिनिधी भोकरदन, मजहर खाॅंन पठाण
भोकरदन पोलीस स्टेशनचे निरीक्षक म्हणून किरन बिडवे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर भोकरदनकराना वाहतुकीची शिस्त लावण्याकरीता बस महामंडळाला गाड्या लावण्या संदर्भात विचारून तिथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर.पोलीस विभागातर्फे सर्व नागरिकांना गेल्या दहा दिवसापासून वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत होते परतु हे नियम पालन होत नसल्याने आखेर बेशिस्त वाहन धारकावर १९ ऑगस्ट रोजी नगरपालिका व भोकरदन पोलिस प्रशासनाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या १९ आगस्ट रोजी रहदारीस अडथळा करणाऱ्या ३४ मोटारसायकल धारकावर वाहन कायदा कलम १२२/१७७ नो पार्कीग याप्रमाणे दंड आकरण्यात आला.
आसुन त्यापैकी २६ मोटारसाकलचा एकुण दंड १६०००/- रुपये दंड घेण्यात आला असुन बाकी ०८ मोटर सायकल धारकानी कागदपत्रे हजर न केल्याने सदर आठ मोटारसायकल या पोलीस ठाणे आवारात लावण्यात आलेल्या असुन सदर कागदपत्रे सादर करणेबाबत सुचना देवुन आकारण्यात आलेला दंड भरुन मोटारसायकल घेवून जाण्याबाबत समज देण्यात आली आसुन सदर कारवाई पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि कुकलारे,पवन राजपूत, सपोफौ भास्कर जाधव, सुदर्शन मोहिते,पोलीस नाईक विकास जाधव, अरुण वाघ,पोलीस कॉन्सटेबल संदीप भुतेकर,नंदकुमार दांडगे, शरद शिंदे,दिपक इंगळे, गणेश पिंपळकर,लक्ष्मण राणगोते, अनिल गवळी,गोपाल सतवन, पोलीस ठाणे भोकरदन अशांनी केली आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा