maharashtra day, workers day, shivshahi news,

तिर्थक्षेत्र भुईज म्हणून गावाचे पौराणिक महात्म्य व धार्मिक परंपरा जपण्याचे प्रत्येक घटकाचे कर्तव्य - उपसरपंच शुभम पवार

वारकरी सांप्रदाय व ग्रामस्थांच्यावतीने भव्य दिंडी सोहळा
Pilgrimage bhuij, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
तिर्थक्षेत्र भुईज म्हणून गावाचे पौराणिक महात्म्य व धार्मिक परंपरा जपण्याचे प्रत्येक घटकाचे कर्तव्य असून भुईंज ग्रामपंचायत सर्व धार्मिक उपक्रमांना वेळोवेळी प्रोत्साहन व मदत करेल आपली संस्कृती व आपले संस्कार आपणच जपू या असा निर्धार प्रत्येकाने केला तर संथ वाहणा-या कृष्णामाई बरोबरच तिर्थक्षेत्र भुईजचे महात्म्य जपण्यास आपण यशस्वी होऊ असे प्रतिपादन भुईंजचे उपसरपंच शुभम पवार यांनी केले.
भुईज ता. वाई येथे आषाढी एकादशीच्या पुर्व संध्येला ज्ञानेश्वरी पारायण मंडळ यांच्या पुढाकाराने गावातील वारकरी सांप्रदाय व ग्रामस्थांच्यावतीने भव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. वाचा शुभारंभ करताना उपसरपंच शुभम पवार बोलत होते. यावेळी पारायण मंडळाचे मार्गदर्शक व जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामदासबापू जाधव, माजी उपसरपंच प्रशांत जाधवराव व देवस्थानचे विश्वस्त मदन शिंदे उपस्थित
होते.
यावेळी बोलताना उपसरपंच शुभम आण्णा पवार म्हणाले की, भुईंज गावाला आचार्य भृगूमहर्षी यांच्या आश्रमामुळे पौराणिक वारसा आहे. तर संत वाहणा-या कृष्णामाईमुळे निसर्गाचे आलौकिक वरदान लाभले. धार्मिक वातावरण आपल्या संस्कृती आणि संस्कारामुळे नव्यापिढीला माहित होते. याचाच भाग म्हणून भुईंज गावातील वारकरी सांप्रदायाचे व पारायण मंडळाचे उपक्रम नेहमीच सर्वांना प्रोत्साहन व प्रेरणा देतात. या हि पुढील काळात या पुण्यभूमीचा वारसा जपण्यासाठी ग्रामपंचायत सर्वतोपरी मदत करेल असे ही ते म्हणाले.
प्रारंभी श्री ज्ञानोबाराय अद्यात्मीक वारकरी गुरुकुल संस्था सोळशी ता कोरेगाव यांच्या बाल वारक-यांनी रिंगण सादर केले त्यांना ह.भ.प. योगेश महाराज यादव ह.भ.प. पल्लवीताई शिंदे ह.भ.प. विशाल महाराज जाधव यांनी मार्गदर्शन केले. या सोहळयाचे संचलन संयोजक किर्तनकार ह.भ.प. मिराताई दिक्षीत यांनी केले. श्री स्वामी समर्थ केंद भुईज व महिला बचत गटातील सर्व महिलांनी यात सहभाग घेतला.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !