श्रोत्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
शनिवार दि. २५ मे रोजी संध्याकाळी ७.३०ते १०.१५ या वेळेत स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान वाई ' च्या वतीने कन्या शाळेच्या सत्यवती जोशी सभागृहात सावरकर व्याख्यानमालाचा शुभारंभ झाला. या व्याख्यानमालेचे हे ३१ वे वर्ष आहे.
सुरवातीला गरवारे फायबर्स चे व्हाईस प्रेसिडेंट वैभव जोशी यांच्या शुभहस्ते श्री नटराज पुजन व स्वातंत्रवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व्याख्यानमालेचा शुभारंभ करण्यात आला. गेली १० वर्षे गरवारे वाॅल रोप्स व फायबर्स मध्ये नोकरीच्या माध्यमातून वाई मधील त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रिडा,आणि वैद्यकीय सहभागाचा व सर्व संस्थांना आर्थिक मदती बद्दल त्यांच्या प्रती असणाऱ्या आपुलकीतून पुढील आयुष्य पुण्यात आरोग्य पूर्ण व समाधानाचे जावो अशा शुभेच्छा देवून त्यांचा शाल,श्रीफळ,पुष्प गुच्छ आणि स्वातंत्रवीर सावरकर लिखित १९५८ चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक देवून त्यांचा गौरव करण्यात आला.
या नंतर तब्बल २.३० तास "स्वतंत्रते भगवती" हा गाण्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. संगीतमय संकल्पनेची निर्मिती. दीपक पाटणकर (सांगली) यांनी केलेली आहे. ही संकल्पना खरोखरच खूप अप्रतिम, अभिनव नि श्रोत्यांच्या थेट अंतःकरणाला भिडणारी आहे. कारण ती सावरकरांच्या तेजस्वी ओजस्वी काव्य प्रतिभेवर आधारित आहे. सांगलीच्या गायक नि वादक वृंदाने सावरकरांची ज्ञात - अज्ञात गीते सादर करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकले. दीपक पाटणकर यांचे निवेदन आणि सूत्रसंचालन अफलातून होते.
व्याख्यानमालेच्या पहिल्याच दिवशी प्रत्यक्ष संगीतमय सावरकर व्याख्यान श्रवण करण्याची सु संधी वाईकर श्रोत्यांना प्राप्त झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सतीश शेंडे, यशवंतराव लेले, सुनीलजी देशपांडे, सौ. मनीषा ताई घैसास, आदित्य चौंडे, . आनंद पटवर्धन, . मंदार सोनपाटकी,सौ.प्रिती फडके,विवेक शिंदे, शिरीष घैसास व अनेक सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.
सत्यवती सभागृह तुडुंब भरले होते
दरवर्षी श्री महागणपती घाटावरच होणारी हि व्याख्यानमाला वादळ वारा व पावसाची शक्यता असल्या मुळे पुढील तीनही दिवस सत्यवती सभागृहात होणार आहे.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा