चालक आणि मालक यांचा मात्र अद्याप कोणतीही सुगावा नाही
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड (प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे)
कन्नड तालुक्याती पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आमदाबाद सारोळा मुख्य रस्त्यावर दिनांक ६/५/२४ रोजी. मोटार सायकल स्वारास ट्रॅक्टर चालकाने समोरील दुचाकी ला ठोकून ट्रॅक्टरसह पोबारा केला.
या घटनेला १४ दिवस उलटले. या अपघातात २४ वर्षांचा तरुण आकाश बाळू जावळे राहणार वाडी तालुका भोकरदन या तरुणाला डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्राव होऊन जागेवर मृत्यू झाला तर त्याचा मित्र अमोल सांडू पिंगळे (वय२५) रा. चांदई एक्को तालुका भोकरदन जिल्हा जालना हल्ली मुक्काम मोरे चौक वाळूज छत्रपती संभाजी नगर यांच्या उजव्या हाताच्या कोपराला फ्रॅक्चर व डाव्या डोळ्याच्या खाली हनवटीला खरचटले असून डाव्या छातीला मुका मार लागलेला आहे.
या घटनेची माहिती पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाचनवेल बीटचे जमादार लालचंद नागलोत व त्यांचे सहकारी संजय दराडे यांना काही सुजाण नागरिकांनी या घटनेची माहिती दिली. या घटनेचा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व आकाश जावळे यास प्राथमिक आरोग्य केंद्र नाचनवेल येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले शविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पिशोर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.
पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार लालचंद नागलोत यांनी तपासाचे चक्री फिरवीत तब्बल १४ दिवसानंतर अपघात करून फरार झालेल्या ट्रॅक्टरचा शोध लावला. ट्रॉली ट्रॅक्टर क्रमांक एम.एच २० ए बी २७ ८७ या भगव्या कलरच्या स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर पिशोर पोलीस ठाण्यात आणण्यात आला.
हा ट्रॅक्टर पिशोर येथील एका लाकडाच्या व्यापाऱ्याचा आहे. परंतु पिशोर पोलीस ठाण्यात चालका विरुद्ध अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. किंवा ट्रॅक्टर मालकाचे नाव समोर आलेले नाही. दिनांक २०/५/२४ रोजी मयताचा मित्र अमोल सांडू पुंगळे याने पिशोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
बीट जमादार लालचंद नागलोत चालक-मालक यांचा शोध घेत आहे अपघातातील ट्रॅक्टर १४ दिवसांनी मिळाला. लवकरात लवकर या ट्रॅक्टरचा चालक व मालक मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थ करीत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा