maharashtra day, workers day, shivshahi news,

बावधन अनपटवाडी गावांच्या बंद केलेल्या एसटी फेऱ्या तातडीने सुरु करा

अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा
Start ST bus immediately, wai, msrtc, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई अनपटवाडी  बावधन म्हातेकरवाडी या गावांची कसलीही पुर्व सुचना न देता वाई आगाराने एसटी सेवा कायमची बंद केल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने वरील गावांनसह १२ वाड्या वस्तीवर राहणारे  १० ते १२ हजार  निषेध केला आहे . चार दिवसात वरील गावांन साठी एसटी बसेस वाई आगाराने सुरु न केल्यास हजारोंच्या संख्येने  ग्रामस्थ मोर्चाने वाई आगाराच्या मुख्य प्रवेशद्वारावर येवुन तिव्र आंदोलन करणार असल्याचे सह्यांचे निवेदन वाईच्या तहसीलदार सोनाली मेटकरी वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक जितेंद्र शहाणे वाई आगाराच्या डेपो मॅनेजर स्वाती बांद्रे यांना देण्यात आले आहे .निवेदनावर १५० ग्रामस्थांनसह माजी सरपंच नितीन मांढरे बावधन सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब कदम अर्जुन अनपट मंगेश अनपट भास्कर अनपट चंद्रकांत सुतार या प्रमुख कार्यकत्यांच्या सह्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे कि बावधन अनपटवाडी हि एसटी गेल्या २४ वर्षा पासुन अखंडित पणे सुरु होती
पण वाई आगाराच्या डेपो मॅनेजरच्या गलथान आणी मनमानी कारभारा मुळे हि एसटी गेल्या दोन महिन्यां पासून आगार प्रमुखांनी स्वताच्या अधिकारात कसलीही पुर्व सुचना न देताच बंद करुन प्रवाशांची फरपट सुरु केली आहे. एसटीच्या या फेऱ्या बंद केल्याने बावधन आणी त्या अंतर्गत असणाऱ्या  १२ वाड्यांन मधील अंदाजे १० ते १२ हजार प्रवाशांनसह  वाईला शिक्षणा साठी येणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनला याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे .एका बाजूला एसटीचे राज्याचे मंत्री विधानसभेत गाव तेथे एसटी बस पोहचुन प्रवाशांना सेवा देण्यासाठी एसटी महामंडळ वचनबध्द आहे अशी फुसकी घोषणा करून दुसरीकडे सातारा विभागाचे डिसी आणी वाई आगाराचे आगार प्रमुख  एसटीविना प्रवाशांचे हाल करताना दिसत आहेत याची खंत वाटते. 
सातारा आणी वाई आगाराचे  महामंडळाचेअधिकारी  म्हणतात कि एसटी हे गरीबांचे हक्काचे वाहन आहे. मग गावा गावांच्या एसटीच्या फेऱ्या बंद करुन प्रवाशांनचे हाल करुन आनंद का साजरा करतात असा संतप्त सवाल बावधन अनपटवाडी ग्रामस्थांनी विचारला आहे. वाई आगाराच्या आगार प्रमुखांनी गावो गावच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करणे गरजेचे आहे वाई तालुका हा डोंगर दऱ्या खोऱ्यातील रहिवासी ग्रामस्थांनचा भाग आहे त्यांना एसटी शिवाय दुसरे दळण वळणाची कसलीही सोय नाही याचे भान वाई आगाराचे आगार प्रमुख सोयिस्करपणे विसरल्याचे त्यांच्या गलथान कारभारातुन स्पष्ट दिसुन येत आहे .
गेल्याच आठवड्यात वाई खंडाळा महाबळेश्वर या तिन तालुक्यांचे कर्तव्यदक्ष आमदार मकरंद पाटील 
यांना समक्ष भेटून वाई तालुक्यातील गावांच्या एसटीच्या बसेच आगार प्रमुखांनी बंद केल्याच्या हजारो ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारी ऐकुन संतप्त झालेल्या आमदारांनी वाईच्या महिला आगार प्रमुख असलेल्या स्वाती बांद्रे यांना बोलावून घेवुन त्यांना वाई तालुक्यातील सर्व गावांच्या बंद केलेल्या एसटीच्या फेर्या तात्काळ सुरु करा असे आदेश दिले होते. पण दुर्दैवाने वाई आगारात आपल्याला नोकरीच करायची नाही तक्रारी जास्त झाल्या तरच आपली येथून बदली होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवुन आगार प्रमुख स्वाती बांद्रे यांनी आमदारांच्या आदेशाला व सुचनांना केराची टोपली दाखवली आहे. हे ही आ. पाटील व कार्यकर्त्यांच्या  लक्षात आले आहे. त्या मुळे लवकरच संपुर्ण वाई तालुक्यातील जनता वाई आगाराच्या डेपो मॅनेजर स्वाती बांद्रे यांच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्या साठी रस्त्यावर ऊतरुन इतरत्र धावणार्या वाई आगाराच्या  एसटी बसेस रोखुन आंदोलन करण्याच्या तयारीला लागले आहेत.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !