झाडे पडली - घरावरचे पत्रे जनावरांचे शेड उडून गेले
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (प्रतिनिधी राज सारवडे)
मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी, आंधळगाव, मारापूर, भाळवणी, पाठखळ, आदी ग्रामीण भागात आज झालेल्या जोरदार वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामध्ये रस्त्यावर झाडे पडले आहेत तर काही ठिकाणी घरावरचे पत्रे, जनावरांचे शेड याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेली दोन महिने कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही झालेल्या नागरिक व जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला हा संघर्ष सुरू असतानाच आज सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान वादळी जोरदार वादळी वाऱ्याने हजेरी लावली.त्यामध्ये ग्रामीण भागातील मारापुर लक्ष्मी दहिवडी, आंधळगाव, पाटकळ, हाजापूर,जालीहाळ, भाळवणी या गावातील गावातील नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेले तर काही पशुपालकाच्या जनावराच्या शेडचे मोठे नुकसान केले. तर कचरेवाडी येथे झाड पडून गाईचा मृत्यू झाला आहे.
या वादळात गाराचा पाऊस पडल्याने फळ पिकाचे देखील नुकसान झाले आहे तर ग्रामीण भागात रस्त्या लगत असणारी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली तर विजेचे खांब मोडून पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला.
जालीहाळ येथे नारायण शेंबडे, भारत शेंबडे ,कुबेर कांबळे, शरद कांबळे ,मधुकर शेंबडे, दामोदर शेंबडे, उषाबाई शेंबडे यांच्या घरांचे पत्रे उडून गेले.भाळवणी येथे बाळू सावजी, आनंदा जावीर, कलावती भगरे, दगडू पुजारी,गणपत माने,अशोक शिंदे, मुक्ताबाई कांबळे मंगल कांबळे हिराबाई कांबळे यांच्या घराचे पत्रे तर ज्ञानेश्वर माने व चंद्रकांत मोरे यांच्या जनावरांच्या शेडचे नुकसान झाले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा