मालकासह मॅनेजरवर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
डिसेंबर २०२२ पासुन ऑगष्ट २०२३ पर्यंत पी डी शाह सन्स कोल्ड स्टोरेज प्रा. लिमिटेड या कंपनीचे मालक शहा व मॅनेजर यांनी संगनमत करून एम आय डी सी वाई येथील त्यांच्या कोल्डस्टोरेज मधील पतंजली फूड्स लिमिटेड कंपनीच्या मालकीचे साठवणूक करून ठेवलेले सुमारे ६ कोटी रुपये किंमतीचे १३४.५ टन बटर परस्पर विकून कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पतंजली फूड्स लिमिटेड कंपनीचे एच आर सुपरवायजर ज्ञानेश्वर रामनाथ आढाव, वय ४६, रा. खडके, ता. नेवासा, जि. अहमदनगर यांनी कंपनीच्या वतीने पी डी शाह सन्स कोल्ड स्टोरेज प्रा. लिमिटेड या कंपनीचे मालक शहा व मॅनेजर यांच्या विरुद्ध वाई पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बिपीन चव्हाण करत आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा