वाहतुकीची झाली कोंडी, मात्र उपअभियंता महेश गोंजारी यांचे तत्पर नियोजन, अर्ध्या तासात वाहतूक सुरळीत
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई वाठार रस्त्यावरील ओझर्डे गावच्या हद्दीतील चाहुर फाट्यावर सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसा मुळे भले मोठे बाभळीचे झाड कोसळल्याने दुतर्फा बाजु कडुन होणारी वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही.
सविस्तर वृत्त असे कि हवामान खात्याने सातारा जिल्ह्यात विजांचा कडकडाटा बरोबर ढगांचा गडगडाटासह गारांचा मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहीती दिली असल्याने याची चोख खबरदारी वाईचे बांधकाम विभागाचे ऊप अभियंता महेश गोंजारी यांनी घेवुन वाई तालुक्यातील कुठल्याही रस्त्यावर गेली दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसात रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे कोसळु शकतात असा अंदाज बांधुन त्यांनी स्वताच्या कार्यालयात २४ तास रस्त्यावर अचानक पणे पडलेली झाडे तात्काळ बाजुला काढण्या साठी झाडे कापण्या साठी कटर आणी शाखा अभियंता सुनील गोरे व त्यांच्या सोबतीला सहाय्यक म्हणून काही कर्मचारी ठेवले आहेत.
सोमवार दि. १३ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वाई वाठार रस्त्यावर असणार्या ओझर्डे गावच्या परिसरात वारा आणी गारांसह मुसळधार पावसाची सुरवात झाली आणी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ओझर्डे गावच्या हद्दीतील चाहुर फाट्यावर बलाढ्य बाभळीचे झाड कोसळले आणी त्यामुळे वाईकडे आणी वाठारकडे जाणारी वाहतुक थांबल्याने दुतर्फा वाहणांच्या रांगा लागल्याची माहिती उप अभियंता महेश गोंजारी यांना मिळताच त्यांनी तातडीने आपतकलीन परस्थीतीवर मात करण्यासाठी उभी केलेली यंत्रणा तात्काळ पाठवुन यंत्रणेने भर पावसात अवघ्या अर्ध्या तासात झाड बाजुला काढुन तुंबलेली वाहतुक सुरळीत केली. रस्त्यावर पडत असलेल्या पावसा मुळे कुठेही झाडे पडली तरी वाहन चालकांनी अथवा नागरिकांनी घाबरुन न जाता बांधकाम विभागाला मोबाईल वरुन माहिती द्या त्या ठिकाणी अवघ्या १५ मिनिटांतच आमची यंत्रणा पोहचुन रस्ता मोकळा करेल असे आवाहन वाईच्या बांधकाम विभागाचे ऊप अभियंता महेश गोंजारी यांनी केले आहे .
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा