प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले स्वागत
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
राज्यपाल रमेश बैस यांचे आज महाबळेश्वर येथील राजभवन येथे आगमन झाले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुष्पगुच्छ देवून प्रशासनाच्यावतीने स्वागत केले.
राज्यपाल रमेश बैस हे महाबळेश्वर येथे दौऱ्यावर आले असून त्यांचे आज सायंकाळी ६ वा. आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती रामबाई बैस यांचेही आगमन झाले. याप्रसंगी राज्यपाल महोदय यांच्या सहसचिव श्रीमती श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार काटकर यांनीही पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल श्री. बैस यांचे स्वागत केले. राज्यपाल महोदय हे शनिवार दि. 25 मे 2024 पर्यंत महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा