वाई परिसरात मान्सून पुर्व पावसाचा कहर
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
पांडेवाडी, ता. वाई येथे सोमवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसात घराची भिंत कोसळून एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत घटनास्थवरून मिळालेली माहिती अशी, सोमवारी रात्री संपूर्ण वाई तालुका अवकाळी पावसाने झोडपून काढला. त्यातच पांडेवाडी येथे संतोष विनायक शिंदे यांच्या घराची भिंत कोसळली. त्यात नामदेव गणपती शिंदे, वय ७० यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची सून व नातू जखमी झाले आहेत. जखमी दोघांना वाई येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सोमवार दि. २० रोजी सायंकाळी वाई तालुक्यातील गावांन मध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने सुरवात केली त्यात तालुक्यातील मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा असणारी मोठ मोठी झाडे कोसळल्याने वाहतूक पुर्णपणे ठप्प झाल्याने नागरिकांनसह वाहन चालकांनची दैना उडाली .या पडलेल्या पावसा मुळे तालुक्यातील गावांचा विद्युत पुरवठा पूर्ण पणे बंद पडला होता. त्यामुळे गावांनी संपुर्ण रात्र अंधारात काढली. या अवकाळी पावसा मुळे नागरीकांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. हभप नामदेव शिंदे यांच्या अपघाती मृत्युने पांडेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा