रिकामे भांडे घेऊन महिलांचे ग्रामपंचायत कार्यालयातच ठिय्या आंदोलन
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून प्रसिद्ध असलेली ग्रामपंचायत दुसरबीड मध्ये मागील काही महिन्यांपासून येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्रासलेले ग्रामस्थ व महिला यांनी वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालय दुसरबीड यांना पाणीटंचाई बाबत उपाययोजना करावी म्हणून वेळोवेळी सूचना निवेदने दिली. परंतु पाणीटंचाई निर्माण झाल्याने टँकरचा प्रस्ताव हा ९ मे रोजी शासनाकडे पाठवून तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार ग्रामपंचायत प्रशासनाने केला.
कॉंग्रेसने आठवडाभरापुर्वी पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला होता त्यानुषंगाने आज महीला व ग्रामस्थांनी काँग्रेसच्या आंदोलनाला साथ देत डफडे वाजवत मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयावर धडकला. याबाबत सविस्तर असे की, येथील वार्ड क्रमांक ४ व ५ मध्ये मागील दीड वर्षापासून तर वार्ड क्रमांक १,२,३ व ६ मध्ये मागील तीन महिन्यापासून पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला जाग यावी यासाठी दिनांक ३ मे रोजी काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. यामध्ये आठवडाभरात पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.
यानंतरही ग्रामपंचायत प्रशासनाच जागे झाले नाही. बेजबाबदार ग्रामपंचायत प्रशासनाला जाग आणण्याकरिता आज काँग्रेसने डफडे बजाव आंदोलन करत थेट ग्रामपंचायत वर धडक दिली. यामध्ये ग्रामस्थ व महिलांनीही काँग्रेसच्या या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल असे आंदोलना दरम्यान ग्रामसचिव यांनी सांगताच आंदोलन धारकांनी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येऊ नये. यावेळी गावात भांडण तंटे होऊ शकतात त्यामुळे गावातील पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा व तशी ग्वाही देण्यात यावी तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले. दोन तासानंतर सचिव टि. जी. चौधरी यांनी संबंधित कंत्राटदार व इंजिनियर यांना दूरध्वनीवरून संपर्क करत २५ मे पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल अशी असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.
यावेळी आंदोलनात काँग्रेसचे कचरू भारस्कर जुनेद अली, सुनील जायभाये, गजानन जायभाये, , शेख रहेमान, अर्जुन घुगे, फौजी तनवीर शेख, अनीस शेख, साबोर पठाण, शहेजाद पठाण, वाघ, अदीम पठाण, हलीमखा पठाण, अनील सांगळे, जुनेद टेलर, बंडु सांगळे, सुखदेव सांगळे, शिवाजी कानडे, माजी सैनिक रफीक शेख, कडुबा पवार, प्रकाश केवट, सत्तार शेख, शेख मोईन, लतिफ शेख, अमीर शेख, मजर शेख, मुजीब शेख गावातील महिला उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस इरफान अली शेख, माजी पं.स. सभापती विलासराव देशमुख, ग्रामपंचायत सरपंच सौ. सरस्वती मखमले, उपसरपंच अशोक गुंजाळ, शरदराव मखमले, गजानन काळे, शंकर केवट हे उपस्थित होते. किनगाव राजा पोलिसांकडून तगडा बंदोबस्त करण्यात आला होता.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा