आपल्या विरुद्ध बोलेल त्याला गजाआड करणे हि हुकुमशाही आहे - शरद पवार
शिवशाही वृत्तसेवा, वाई तालुका प्रतिनिधी, शुभम कोदे
देशात एका राज्यात जाळपोळ होते. स्त्रियांवर अत्याचार होतात मात्र मोदी त्यावर साधे भाष्यही करत नाहीत. भ्रष्टाचार व सत्तेचा गैरवापर कसा करायचा याचे उदाहरण मोदींनी घालून दिले. आपल्या विरुद्ध बोलेल त्याला गजाआड करणे ही हुकूमशाही आहे. यामुळे आज देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. देशाची लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मताधिक्य देऊन निवडून द्यावे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांची प्रचार सभा येथील भाजी मंडई येथे झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी पालक मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार शिकांत शिंदे, बाळासाहेब भिलारे, रमेश धायगुडे, सागर साळुंखे, जिल्हाध्यक्ष सुमित माने, अभिनेत्री अश्विनी महांगडे, ऍड. वर्षा देशपांडे, अनिल जगताप, डी. एम. बावळेकर, राजकुमार पाटील, डॉ. नितीन सावंत, ऍड. विजय पिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार पुढे म्हणाले, मोदी भाषणामध्ये आपण काय केले हे कधीच सांगत नाहीत मात्र दुसऱ्यांनी काय केले नाही हे सांगतात. शेतकऱ्यांची कर्जमाफी हमीभाव शेतकऱ्यांना स्वाभिमानाने उभे करण्याचे काम मी कृषी मंत्री असताना केली. मोदींनी जी ध्येयधोरणे राबवलीत त्यामुळे देशात महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे. महागाई वाढवणाऱ्या सरकारला सत्तेत बसण्याचा अधिकार आहे का. तुम्ही राहुल गांधींवर टीका करता नेहरूंवर टीका करतात ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी 11 वर्षे तुरुंगात घालवली. च्या यशवंतराव चव्हाण यांनी देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेऊन देशाची इज्जत वाचवली. अशा नायकानावर टीका करण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. शशिकांत शिंदे त्यांच्यावर खोटे भ्रष्टाचाराचे आरोप करून बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे. बाजार समितीवर ते कामगार प्रतिनिधी म्हणून होते. त्यांना कोणतेही अधिकार नसताना त्यांनी भ्रष्टाचार केलाच कसा, असेही ते म्हणाले.
माजी मुखमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, जनतेच्या प्रश्नाची चर्चा करायचं सोडून नरेंद्र मोदी भलतीच चर्चा करताना दिसतात. इंडिया महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या जाहीरनामाची चर्चा तुम्ही करता. त्यापेक्षा तुम्ही काय केले ते सांगा. पाचशे रुपये देऊन भाजपा सभेला गर्दी जमवतात. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बेरोजगारी, शेतीमालाचा हमीभाव, नोकऱ्या, या विषयावर पंतप्रधान बोलत का नाहीत. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना ज्या गतीने देश प्रगती करीत होता किमान ती गती ठेवली असती तर मोदीजी आज आपला देश जगात तिसऱ्या नंबर वर असता.
सातारचे माजी पालक मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, कर्नाटक मधील खासदार संविधान बदलायचे आहे म्हणून ४०० पार हवे असल्याचे बोलले. अशांना तुम्ही साथ देणार का. देशाचे संविधान वाचवण्यासाठी आज आपल्याला मैदानात उतरावे लागेल. आपले उमेदवार शशिकांत शिंदे सर्व डोंगरदऱ्यामध्ये त्यांचा संपर्क आहे. गेली 25 वर्षे पाहत आहे शशिकांत शिंदे साहेब हे जनतेला वेळ देतात लोकांना भेटतात आपल्या घरामध्ये गावांमध्ये कार्यक्रम असेल प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबार घेण्याची भूमिका ते घेतात. वसंतराव चव्हाण यांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी येत्या सात तारखेला तुतारी समोरील बटन दाबून शशिकांत शिंदे यांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करूया.
शशिकांत शिंदे म्हणाले, खंडाळ्यामध्ये औद्योगिक क्षेत्र वाढलं आहे. परंतु स्थानिक तरुनाना संधी मिळत नाही. आमच्या लोकांच्या मागणी काय साताऱ्यामध्ये आयटी पार्क, इंडस्ट्री असावी, म्हणून माझ्या सर्वांना विनंती आहे. यावेळी मागच्या सारखाच इतिहास रचयचा आहे. माझा नेता, पृथ्वीराज बाबा, बाळासाहेब पाटील वगैरे सगळे मंडळी आम्ही आता लढतोय या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी. आम्ही लढतोय या देशाच्या लोकशाहीसाठी. आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करून सात दिवस असं काम करा अशा पद्धतीने काम करा इतिहास घडवा. आता आपण पवार साहेबाना साथ देऊया. पुन्हा इतिहास घडवून आणू असा आपण शब्द साहेबांना देऊया. महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येईल ही जबाबदारी तुमची आहे.
यावेळी काँग्रेस राज्य सरचिटणीस राजेंद्र शेलार, संतोष बाबर, सुनील गव्हाणे, राणूअक्का फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे, संदीप देसाई, शिवसेना जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते, भारत पाटणकर यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक व स्वागत प्रसाद सुर्वे यांनी केले. रमेश धायगुडे यांनी आभार मानले. यावेळी दीपक पवार, राजाभाऊ खरात, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मोहिते, सुनील गवाने, राजेश शिंदे, रमेश गायकवाड, चरण गायकवाड, डॉ. सतीश बाबर, प्रसाद सुर्वे, संतोष ननावरे, यांच्यासह वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा