लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचाऱ्यांचे पथसंचलन
शिवशाही वृत्तसेवा, भोकरदन तालुका प्रतिनिधी पारधमजहर खाॅंन पठाण
पोलीस ठाणे हद्दीतील गावांमध्ये पारध पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि केंद्रीय राखीव दलाचे जवान यांचे पथसंचलन करण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पारध पोलीस ठाण्याचे स. पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे यांच्या नेतृत्वात केंद्रीय राखीव
दलाचे साठ जवान तर पारध पोलीस ठाण्याचे पंधरा कर्मचारी असे एकूण पंचाहत्तर कर्मचाऱ्यांचे शिस्तबध्द पध्दतीने पथसंचलन पारध पोलीस ठाणे हद्दीतील पारधसह वालसावंगी, धावडा, आणवा, जळगाव सपकाळ, पिंपळगाव आदी मोठी लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये हे पथसंचलन करण्यात आले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा