वारा गारपिटीने प्रचंड प्रमाणात रब्बी पिकांचे नुकसान
शिवशाही वृत्तसेवा, भोकरदन तालुका प्रतिनिधी मजहर खाॅंन पठाण
खरीप खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीच्या जखमा ताज्या असताना पुन्हा एकदा आता रब्बी हंगामातील भरलेल्या पिकांना पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बारा आणि गारपिटीने तडाका दिला. असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सविस्तर बातमी अशी की भोकरदन तालुका साहा ग्रामीण भागात जोरदार पाऊस आणि गारपीट यामुळे रब्बी हंगामातील गहू हरभरा मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोसाट्याचा बारा जोरदार पाऊस आणि गारपीट यामुळे रब्बी हंगामातील हातचे आलेले पीक गेल्या जमा आहे. सोसाट्याचा वार पाऊस आणि गारपीट यामुळे सोंगणीचर
हरभरा पिक शेतातच आडव आलेले हरभरा मका गहू पीक आडवे झाले असून शेतकऱ्यांचा हाती आलेला पिकांचा घास गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. शिवाय वारा पाऊस आणि गारपिटीचा फटका फुल शेती पानतांडे आणि द्राक्षबाग यांना सुद्धा बसला आहे.
काल सायंकाळी अचानक वातावरण बदल होऊन जोराचा वारा आणि गारपीट यामुळे सगळीकडे धांदर उडाली अनेकांच्या घरावरील पत्रे वाऱ्यामुळे उडून गेली गहू मका झाले अनेक शेतकऱ्यांनी सोंगणी करून गंज मारून ठेवलेले हरभरा गहू पिकात पाणी साचले तर अनेक गंज वाऱ्यामुळे उडून गेले यामुळे बळीराजा पूर्णतः उध्वस्त झाला आहे. शिवाय आज पण दुपारी जोरदार पाऊस परिसरात पडला सोबत सुसाट वारा देखील बाहला यामुळे पुन्हा एकदा तडका बसला. खरीप हंगाम देखील शेतकऱ्यांना हाती लागला नाही आणि आता रब्बी हंगामातील पिके सुद्धा अवकाळी पाऊस, वारा आणि गारपिटीने हिसकावून घेतली असून यंदा दुहेरी नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागणार आहे. यामुळे लावलेला खर्च देखील वसूल होणार नसून शासनाने शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी शिवाय पीकविमा मंजूर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा