maharashtra day, workers day, shivshahi news,

सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे गटाची बैठक संपन्न

मतदार संघातील गावांचा आढावा आणि कार्यकर्त्यांचे विचार घेऊन आगामी निवडणुकीतील रणनीती वर चर्चा
Chairman Kalyan Kale group meeting concluded , Cooperative Shiromani Factory , pandharpur ,shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदेशानूसार दि.27 व 28 फेब्रुवारी या कालावधीत पंढरपूर तालुक्यातील मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा, माढा व सांगोला विधानसभा मतदार संघात येणाऱ्या गावांच्या काळे गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांचे प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात पार पडली.
यावेळी बैठकी दरम्यान झालेल्या पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघातील गावांचा आढावा घेवून कार्यकर्त्यांच्या अडी-अडचणी जाणुन घेत काही कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, गाव पातळीवर आपल्या गटाचा फक्त निवडणुकीच्या कालावधीतच मतांसाठी वापर केलेला असून  तदनंतर गाव पातळीवर आमचा विचार केला जात नाही अशी तटस्थ मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली. यावर सगळयांची मते जाणुन घेत कल्याणराव काळे म्हणाले की, आगामी काळात येवू घातलेल्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती  निवडणुकीत आपला गाव पातळीवरील निश्चितच विचार करण्यास नेते मंडळीला भाग पाडू असे  आश्वासन बैठकी दरम्यान देण्यात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले.
 यावेळी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर, विठठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक महादेव देठे, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळूंखे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेअरमन विष्णु यलमार, विठठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधानदादा काळे, विविध संस्थेचे आजी माजी पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, युवक वर्ग आदी  मोठया संख्येने उपस्थित होते.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !