सिंदखेड राजा-मेहकर रोडवरील घटना
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी आरिफ शेख
सिंदखेडराजा ते मेहकर रोडवर पाच किलोमीटर अंतरावरभरधाव वेगात असलेल्या दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भिषण अपघातात एक ट्रक चालक 'ऑन दि स्पॉ ठार झाला. तर दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला, सिंदखेड राजा-मेहकर रोडवरील लभानदेव मंदिराजवळ आज २७ मार्चच्या दुपारी ही दुदैवी घटना घडली. जखमी चालकावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघातामुळे रस्ता ब्लॉक झाल्याने लांबचलांब वाहनाच्या रांगा लागल्या. त्यामुळे बराच वेळ या रस्त्यावरील वाहतूक बंद राहीली. ट्रक क्रमांक एमएच-२६-एक्यू-१२३५ चालक
त्याच्या ताब्यातील ट्रक घेऊन जालना येथून मेहकरकडे येत होता. तर ट्रक क्रमांक सीजीओ-४- एनजी-८९६५ चा चालक त्याच्या ताब्यातील ट्रक घेऊन मेहकरकडून जालनाकडे जात होता. भरधाव वेगात असलेले हे दोन्ही ट्रक लभानदेव मंदिराजवळ आल्यानंतर त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली.धडक इतकी जोरदार होती की, दोन्हीट्रकच्या कैबिन अक्षरशःचूरा होऊन ट्रक चालक रितेश शर्मा याच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले.
आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच सिदखेडराजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ब्रह्मदेव शेळके यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. जखमी चालकाला प्रथम सिंदखेड राजा तर त्यानंतर जालना येथील रुग्णालयात रवाना केले. अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद पडल्याने बराच वेळ वाहतूक खोळंबली होती. रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा