maharashtra day, workers day, shivshahi news,

मानवी जीवनाची अखेर सुखकर करण्यासाठी गावसहभागातून धडपड

किनगावजट्टूतील स्मशानभूमीचे होणार नंदनवन, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग
The graveyard in Kingavajattu will become a paradise , Sindkhedaraja , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
स्मशानभूमी ही मानवी जीवनाचा अखेरचा थांबा असतो. परंतु, गावातील दुरवस्था झालेल्या स्मशानभूमीमुळे अनेकांना शेवटचा प्रवासही थोडा नाराजीनेच करावा लागतो. परंतु, किनगावजट्टू गावाचे भूमिपुत्र व तालुक्यातील आदर्श ग्रामसेवक विनोद सातपुते, स्वच्छता समितीचे अध्यक्ष राजेश नागरे यांनी पुढाकार घेऊन गावाच्या स्मशानभूमीचे नंदनवन करण्याचा वीडा उचलला असून, संत गजानन महाराज प्रगटदिनापासून स्म  सुशोभिकरणाच्या कामाला सुरूवातदेखील झाली आहे. या स्मशानभूमीची दुरवस्था दूर करून तिचा कायापालट करण्यासाठी ग्रामस्थदेखील या दोघांना चांगली साथ देत असल्याचे दिसून येत आहे.
लोणार तालुक्यातील किनगावजट्टू येथील देवीच्या मंदिरात जवळील खापरखेड रस्त्यावर असलेल्या स्मशानभूमीची फारच बिकट अवस्था झालेली आहे. त्यामुळे येथील स्वच्छता समितीचे अध्यक्ष राजेश नागरे व सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे सिंदखेडराजा तालुक्यातील आदर्श ग्रामसेवक विनोद सातपुते यांनी सदर स्मशानभूमीचे नंदनवन करण्याचा ध्यास घेतला आहे. यामुळे संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. 
स्मशानभूमीमध्ये असलेली झाडेझुडपे, काटेरी झाडे, व इतर अनावश्यक बाबी काढून टाकण्यात आल्या आहेत. तसेच, स्मशानभूमीची स्वच्छता करून लवकरच या स्मशानभूमीमध्ये नागरिकांना असणार्‍या आवश्यक सुविधा उपलब्ध करून, स्मशानभूमीचे नंदनवन केले जाणार आहे. यामध्ये बसण्याची व्यवस्था, स्वच्छता, वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष लागवड करून मानवी जीवनाचा अंत, व त्यावर होणारे अंत्यसंस्कार आनंददायी वातावरणात व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 
हे सर्व करण्यासाठी लोकसभागाचा वापर करून, तरूणवर्गालाही या कार्यात सहभागी केले जात आहे. यासाठी राजेश नागरे व विनोद सातपुते हे सातत्याने प्रयत्न करत आहेत. विनोद सातपुते हे ग्रामसेवक म्हणून तालुक्यात सर्वपरिचित असून, त्यांच्या लोकाभिमुख कामामुळे प्रशासन स्तरावरदेखील त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !