maharashtra day, workers day, shivshahi news,

जीवन विकास विद्यालयाचे दहा विद्यार्थी करणार विमानाने प्रवास

प्रश्न मंजुषा परीक्षा उपक्रमाची फलप्राप्ती  
Ten students of Jeevan Vikas Vidyalaya will travel by plane , buldhana ,shivshahi  news.

           
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी  प्रतिक सोनपसारे 
  जीवन विकास विद्यालयात सतत विविध उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून या वर्षी गत काही महिन्यांपासून मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा व जनरल नॉलेज वाढावे या उद्देशाने विद्यार्थ्यांना विविध विषयांचे प्रश्न देऊन त्यांचे कडून अभ्यास घेऊन परीक्षा घेण्यात आली.1990 च्या बॅचने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला व शाळेतील डी. एस. दहातोंडे सर व डी. एल. वायाळ सरांच्या नेतृत्वात इतरही शिक्षकांनी सहकार्य करीत हा उपक्रम पुढे नेला. नुकताच या परीक्षेचा निकाल घोषित केला गेला. यात सर्वाधिक गुण मिळालेल्या 10 विद्यार्थ्यांची निवड झाली. ह्या मुला मुलींना बक्षीस म्हणून छत्रपती संभाजी नगर ते मुंबई विमान प्रवास घडवून मुंबई नगरीची सहल केली जाणार आहे. 
यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी शिक्षकांनी आर्थिक मदत देऊ केली आहे. सदर आर्थिक तरतूदि साठी सर्वच शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर बांधवांनी मदतीचा हात पुढे करून आपली विद्यार्थ्यांप्रती असलेले कर्तव्य पार पाडले. लहान वयात मुलांना राजधानीतील बाबींची माहिती मिळेल व त्यांच्यात स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी हा प्रामाणिक उद्देश आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थाचालक व प्राचार्य गणेश भांगे सरांनी अभिनंदन केले उर्वरित मुलांना प्रशस्ती पत्र व शिल्ड देण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.‌
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !