उन्हाळ्याचा तडाका सर्व प्राणिमात्रांनाही
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
आदमपूर: देगलूर वन परिक्षेत्रात येत असलेल्या आदमपूर, केरुर, अजनी, मुतन्याळ या वन परिसरात अनेक जातीचे वन्य प्राण्यांची संख्या भरपूर प्रमाणात आहे. या सर्व प्राण्यांची सध्या सुरू असलेल्या उन्हाळ्याच्या दिवसात तहान भागवण्याच्या दृष्टीने देगलूर वनपरिक्षेत्र विभागाकडून कृत्रिम पानवठे व सिमेंट पानवटे तयार करीत त्यात टँकरद्वारे पाणी सोडून वन्य प्राणी व वन्यजीवांची तहान भागवण्यात येत आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असल्याने वनांमधील असलेल्या डबकातील व छोट्या-मोठ्या ओढ्यातील पाणी हे उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानामुळे संपूर्ण आटून गेले असल्याने वन परीक्षेत्रात असणाऱ्या मुक्या वन्यप्राणी व वन्य जीवांना पाण्याची व्यवस्था व्हावी. व ते वन्यप्राणी पिण्याच्या पाण्यासाठी मानवी वस्तीकडे भटकंती करू नये यांची दक्षता म्हणून केरूर वन परिक्षेत्रात येत असलेल्या वन्य भागात अनेक ठिकाणी कृत्रिम व सिमेंटचे पाणवठे तयार करण्यात आले आहेत. त्या कृत्रिम व सिमेंटच्या पानवट्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करून वनपरिक्षेत्रात आढळणाऱ्या सर्व मुक्या वन्य प्राण्यांचे व वन्य जीवांची तहान भागवण्यात येत आहे . सदर उपक्रम नांदेड जिल्ह्याचे उपवनसंरक्षक केशवजी वाबळे ,
सहाय्यक वनसंरक्षक भीमसेन ठाकूर (तेंदू व कॅम्पा) यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूरचे वन परिक्षेत्र अधिकारी निखिल हिवरे यांच्या सूचनेनुसार वनपाल शंकर गेडाम, वनरक्षक सहदेव दोसलवार ,वनमजूर सुभाष नाईक व इतर स्थानिक वनमजूर यांच्या सहकार्याने देगलूर वन परिक्षेत्रात येत असलेल्या आदमपूर, केरुर, अंजनी, मुतन्याळ वनपरिक्षेत्रात तयार केलेल्या पानवठयात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येऊन कडाक्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात वन्यप्राणी काळविट, नीलगाई, हरिण या प्राण्यासह इतर अन्य वन्यप्राणी व वन्यजीव्याची वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्याकडून तहान भागवली जात आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा