लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची जोरदार तयारी
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
हिंगोली) दि. 19 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील कै. शिवाजीराव देशमुख सभागृहामध्ये सर्व नियुक्त पथक प्रमुख आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वगवाड, सखाराम मांडवगडे, मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी सर्व नियुक्त पथक प्रमुख, क्षेत्रीय अधिकारी व नियुक्त विविध पथकाशी संबधीतांना निवडणूक विषयक कामकाजाबाबत संक्षिप्त प्रशिक्षण दिले.
यावेळी अपर तहसीलदार हिमालय घोरपडे, सावित्री सुरे, उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या उपनिरीक्षक नलीनी काळपांडे, प्रकल्प अधिकारी पंडित मस्के यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा