रब्बी पिकाचे प्रचंड नुकसान अनेक ठिकाणी पिके आडवी पडली
शिवशाही वृत्तसेवा, नायगाव तालुका प्रतिनिधी संतोष कदम
विजेच्या कडकडाटात ,वादळी वाऱ्यासह,नायगाव शहरासह परिसरात गारांचा पाऊस पडला असून रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तर ज्वारी,मका सह भाजी पाला,हरभरा ,कोथिंबीर,आदी पिके आडवी पडली आहेत.
शनिवारी सायंकाळी चार च्या दरम्यान नायगाव शहरासह परिसरात विजेच्या कडकडाटात गाराच्या पावसाला सुरुवात झाली.रस्त्यावर घरराघरात वादळी वाऱ्याने गारा शिरून पाऊस शिरला.अनेकांचे पत्र उडून गेले तर या भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते.
अचानक सुरू झालेल्या पावसाने व्यापारी वर्गाचे रस्त्यावर मांडलेले सामान छोटे दुकानदार यांच्या रस्त्यावरील व्यापाऱ्या वर खूप संकट कोसळले.शेतकरी वर्गाची हरभरा,गहू,जमा केला तो झाकण्याची धावपळ दिसून आली.अनेकांची ज्वारी आडवी पाडली असून त्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.गारा खूप मोठ्या प्रमाणात पडल्याचे दिसून आले अनेकांचे घराचे व गाडीचे काच फुटल्याचे दिसून आले.
परत सायंकाळी पावसाला सुरुवात
दुपारी पडलेल्या पावसा नंतर सायंकाळी 6 वाजता परत पावसाला जोरदार सुरुवात झाली.भरून आलेले आभाळ आणि सर्वत्र ढगाळ वातावरण या मुळे सर्वत्र पावसाळ्याची स्थिती जाणवत होती अनेकांना रस्त्यावरून घराकडे जाताना भिजत जाणे भाग पडले.शेतातील व घर कामावरील रोजगाराची या पावसाने चांगलीच धांदल उडवली.रस्त्यावरून पाणी वाहत होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा