maharashtra day, workers day, shivshahi news,

नायगाव मतदार संघात आदर्श आचार संहितेचे पालन सर्वांनी करावे

अन्यथा कार्यवाहीला सामोरे जावे लागेल - स्वाती दाभाड 
Everyone should follow the model code of conduct in the constituency , Swati Dabhad , nanded ,shivshahi news.


शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर 
नांदेड लोकसभेच्या निवडणुकीच्या आदर्श  आचार संहितेचे पालन सर्वांनी करणे आवश्यक असुन नायगाव मतदार संघात कोणत्याही प्रकारचे आचार संहितेचे नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेऊन जनता व नेतेमंडळी यांनी सहकार्य करावे अन्यथा प्रशासनाला या घटनेचे गांभीर्याने दखल घेणे भाग पडणार आहे असे ८९ नायगाव मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी दि.१७ मार्च रोज रविवारी दुपारी १ .०० वा.पार पडलेल्या तहसील कार्यालय नायगाव येथील पत्रकार परिषदेत मांडले.
 लोकसभा मतदार संघ १६ नांदेड मध्ये २६ एप्रिलला लोकसभेसाठी मतदान होणार असून मतदार संघामध्ये दिनांक १६-३-२०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून ही अधिसूचना निघे पर्यंत राहणार आहे.आचार संहिता भंग करणा-यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.२८ मार्चला अधिसूचना निघणार असून ४ एप्रिल ही उमेदवारीसाठी अंतिम तारीख आहे.तर ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
६ मतदान केंद्र संवेदन शील
 नायगाव मतदार संघात ६ मतदान केंद्र संवेदनशील आहेत  या मध्ये नायगाव मध्ये ३ तर उमरी मध्ये ३ आहेत.नायगाव मांजरम वाडी,व पिंपळगाव येथे दोन एकूण तीन तर उमरी मध्ये कळगाव मध्ये दोन तर गोळेगाव एक असे तीन, एकूण सहा मतदार केंद्र संवेदन शील आहेत.
 नांदेड लोकसभेसाठी  दुसऱ्या टप्यात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे व देशभरातील मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. ८९ नायगांव विभानसभा मतदारसंघामध्ये २९८२३३ मतदार आहेत. या साठी एकूण ३४९ मतदान केंद्र असून यातील तालुका निहाय नायगाव १७१,धर्माबाद ८७,उमरी ९१,हे  सज्ज झाले आहेत. ८९ नायगांव विधानसभा क्षेत्रामध्ये ८५ वर्ष वयापेक्षा अधिक वयाचे मतदार व दिव्यांग मतदार यांचे व्हेरीफीकेशन सुरु असून त्यांच्यापैकी ज्यांची मतदान केंद्रावर यायची क्षमता नसेल त्यांना प्रशासन त्यांच्या घरी जाऊन मतदान प्रक्रिया पोस्टल पद्धतीने पूर्ण करणार आहे..
प्रशासन सज्ज; तरूणाईला मतदान करण्याची साद
लोकसभेसाठी सर्व समित्यांचे गठन करण्यात आले असून कालपासुन या सर्व समित्या आपापल्या कक्षाचे काम करणार आहेत. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी मतदान करताना निवडणूक ओळखपत्र नसले तरी १६ प्रकारचे मतदान ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत अशी माहिती दिली. अन्य शासनमान्य अधिकृत ओळखपत्र दाखवून मताधिकार बजावता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले,
     ८९ नायगांव विधानसभा मतदार संघातील तरुण मतदारांनी तसेच पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांनी स्वत सोबत घरातील सर्व मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होतील यासाठी पुढाकार घ्यावा. लोकशाहीने मतदान प्रक्रियेमध्ये आपला अनुकूल मताधिकार व तटस्थता नोंदण्याची व्यवस्था ईव्हीएम मशीनद्वारे केली आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
तातडीने बॅनर हटवण्याचे काम चालू
शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाणे व खाजगी मालमत्ता तसेच कार्यालयामध्ये या कालावधीत असणारे योजनांचे राजकीय पक्षांचे कोणतेही बॅनर पोस्टर अनुक्रमे पुढील काढून घेण्याचे निर्देशही आजच्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
 
मतदान केंद्रावर प्रतिक्षालय
या निवडणुकीमध्ये नांदेड जिल्हा प्रशासनाने कोणत्याही मतदान केंद्रावर मतदारांना ताटकळत राहावे असे होवु नये यासाठी त्यांच्यासाठी प्रतिक्षालय निर्माण करण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. आवश्यक आहे त्या ठिकाणी अतिरिक्त मंडप टाकण्यात येईल, बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व सर्व इतर अपेक्षित सुविधांची व्यवस्था करण्यात येईल, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !