दोन्ही गटांतील पाच जणांविरोधात गुन्हे दाखल
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी आरिफ शेख.
सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे धुलीवंदनाच्या सणाला गालबोट लागले असून, येथील पोलीस मदत केंद्राजवळ आपसात हाणामारी केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्रवीण भीवसन साळवे (वय ३२), पवन भीवसन साळवे (वय ३०), शब्बीर खान उमरखा पठाण (वय ५०), सोहेल खान शब्बीर खान पठाण (वय २३) सर्व रा. मलकापूर पांग्रा अशी आरोपींची नावे आहेत. जोरदार हाणामारी सुरू असल्याची माहिती मिळताच ठाणेदार स्वप्निल नाईक, दुय्यम ठाणेदार रविंद्र सानप यांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली होती. मलकापूर पांग्रा हे संवेदनशील गांव असून, मागे एका बैल व्यापार्याचा येथे खून करण्यात आला होता.
गांवातील सर्व अवैध धंदे बंद करण्यात आले असून, जमादाराच्या वरदहस्तामुळे लपून छपून येथे मोबाईलव्दारे वरलीचे धंदे सुरू असल्याची कुणकुण मात्र ऐकू येत आहे. त्यामुळेच येथे देवाणघेवाणीवरून खटके उडत असल्याने कठोर कारवाईची मागणी नागरिकांत जोर धरू लागली आहे. उपरोक्त घटनेचा पुढील तपास दुय्यम ठाणेदार रविंद्र सानप हे करीत आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा