समाजात तणाव पोलीस बंदोबस्त तैनात....
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर.
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे खुर्द येथे दिनांक १० मार्च २०२४ रोजी शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने दुपारी 2 वा. चौकातील लोखंडी खाबावर भगवा झेंडा लावुन निळा झेंडा काडुन टाकल्याने दोन समाजात तणाव निर्माण झाला. प्रकरण मारहाण व अश्लिल शिव्या गाळ पर्यंत पोचवले आहे. सदर घटना 10 मार्च रात्री उशिरा रुई खुर्द येथे घडली.
कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या ॲट्रॉसिटी प्रकरणातील फिर्यादी साहेब पांडुरंग पवार यांच्या तक्रारी वरून आरोपी श्याम चपंतराव बेलकर ,कृष्णा सुधाकर जाधव, विलास मोरे या तीन जणांवर कुंटूर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तीन किलोमीटरवर रुई खुर्द येथील साठे नगर चौका मध्ये असलेल्या लोखंडी खांबावर त्याच ठिकाणी निळा झेंडा होता तो झेंडा काडून भगवा लावल्याच्या कारणा वरून झालेल्या बाचा बाचित जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार करण्यात आली असल्याने तिघा जनावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
धर्माबाद ते उपविभागीय पोलीस अधिकारी संपत यांच्या मार्गदर्शनाखाली कुंटूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण श्रीहरी पाटील यांनी रुई खुर्द येथे गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थिती मध्ये शांतता कमीटी ची बैठक घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार खोले तपास सुरू असुन हे घटना स्थळी आहेत....
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा