अवैध उत्खनन सुरूच
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा तालुका प्रतिनीधी , आरिफ शेख
तालुक्यातील दुसरबीड खडकपूर्णा नदीच्या पात्रातून होत असलेल्या रेती उत्खननासह वाहतुकीवर 'वॉच' ठेवण्यासाठी महसूल विभागाकडून तढेगाव फाट्यावर टिनशेड उभारली आहे. मात्र, या टिनशेडमध्ये कुणीच राहात नसल्याने ती शोभेची बनली आहे. त्यातच ही टिनशेड अज्ञातांनी काढून टाकण्याचा प्रयत्न केला.
जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी रेती चोरीला आळा घालण्यासाठी विविध पथके नेमली आहेत. महसूल विभागाने हजारो रुपये खर्च करून तपासणी नाके तयार केले व त्यानुसार दुसरबीड-सिंदखेडराजा मार्गावर खडकपूर्णा नदीजवळ राहेरी पुलाच्या पूर्वेला तढेगाव फाट्यावर एक शेड उभारण्यात आली होती. या शेडचा चोरट्या रेती वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा तर झाला नाहीच,
मात्र ही शेड असून नसून खोळंबा झाल्यासारखी या फाट्यावर प्रतीक्षेत उभी होती. शेड बनवल्यापासून त्याठिकाणी एकही महसूल कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे अज्ञातांनी ही शेड काढून टाकण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले.
रेती माफियांना पायबंद घालण्यासाठी रेती घाट परिसरातील छुपे रस्तेही महसूल विभागाने जेसीबीच्या सहाय्याने खोदून टाकले होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा