maharashtra day, workers day, shivshahi news,

सहकार शिरोमणी स्व्.वसंतराव (दादा) काळे यांच्या 22 व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम

सहकार शिरोमणी कारखाना कार्यस्थळावर रक्तदान शिबिर संपन्न
Vasantrao (Dada) Kale Jayanti , Vasantrao (Dada) Kale , pandharpur , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
संस्थापक सहकार शिरोमणी स्व्.वसंतराव (दादा) काळे यांच्या 80 व्या जयंतीनिमित्त व 22 व्या पुण्यतिथीनिमित्त चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यस्थळावर दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, 9 फेब्रुवारीला, सहकार शिरोमणी कारखाना व वसंतदादा मेडिकल फौंडेशन संचलित जनकल्याण हॉस्पीटल यांच्या संयुक्त्‍ विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरामध्ये 80 रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवुन रक्तदान केले. रक्तदात्यांना पिण्याचे पाण्याचे जार वाटप करण्यात आले व प्रशस्तीपत्रक देवुन सन्मानित करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन जिल्हा नियोजन व विकास मंडळचे सदस्य्‍ सुरेशआबा पालवे यांचे शुभहस्ते करण्यात आले, काररखान्याचे व्हा.चेअरमन भारत सोपान कोळेकर यांचे अध्यक्षतेखाली व वसंतदादा काळे मेडिकल फौंऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधिर शिनगारे यांचे प्रमुख उपस्थितीत शिबीर संपन्न्‍ झाले. सुरुवातीस श्रीविठ्ठल व स्व्.वसंतदादांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांचे शुभहस्ते करण्यात आले.
सदर प्रसंगी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सर्वात श्रैष्ठ दान, रक्तदान असून, ज्या रकतदात्यांनी सहभाग नोंदवुन रक्तदान केले त्यांचे आभार मानले. यावेळी डॉ.सुधिर शिनगारे यांनी जनकल्याण हॉस्पीटलच्या माध्यमातुन राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या योजनांची व हॉस्पीटलच्या वतीने विविध आजारावर करण्यात येत असलेल्या इलाजाची माहिती दिली. सदर शिबीरामध्ये पंढरपूर ब्लड सेंटरचे जनसंपर्क अधिकारी संतोष उपाध्ये, टेक्नीशीयन शुभम घोंगे, गणेश सलगर, साक्षी सोनवणे, नर्स रजिया नदाफ यांनी परिश्रम घेतले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, सभासद शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, कामगार उपस्थित होते.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !