पहाटेपर्यंत चालू होते रेस्क्यू ऑपरेशन
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला तब्बल ११ तासांच्या महतप्रयासानंतर वाचविण्यास वनविभागाच्या पथकाला यश आले. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी चारवाजेच्या सुमारास हा बिबट्याचा बछडा विहीरीत पडल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने हालचाली करून पहाटे तीन वाजेदरम्यान या बछड्याला विहीरीतून सुरक्षीत बाहेर काढले.
बुलढाणा वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या करवंड शिवारात गोविंद चव्हाण यांच्या शेतात असलेल्या विहिरीत एक बिबट्याच्या बछडा पडल्याचे त्यांचे निदर्शनास आले होते. त्यांनी त्याची माहिती तत्काळ बुलढाणा वन विभागाला दिली. त्यानुषंगाने आरएफओ अभिजीत ठाकरे रेस्क्यू टीमचे वनपाल रामेश्वर वायाळ, प्रफुल मोरे, मोहसिन खान, वनरक्षक रानी जोगदंड पाटील, संदीप मडावी, परमेश्वर सावळे, दीपक घोरपडे, दीपक गायकवाड, अमोल चव्हाण, ऋषी हिवाळे, प्रवीण सोनुने हे सर्वजण बचाव साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा