लॉन टेनिस स्पर्धेचे उदघाटन
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली (प्रतिनिधी)- येथील सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती व हिंगोली जिल्हा वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने स्व.ऍड.पंडितराव देशमुख क्रीडा संकुल परिसरात मंगळवारी लॉन टेनिस स्पर्धा घेण्यात आली.
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती व हिंगोली जिल्हा वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने स्व.ऍड.पंडितराव देशमुख क्रीडा संकुल अकोला रोड येथे लॉन टेनिस स्पर्धेचे उद्घाटन मंगळवार दि.१३ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. सदरील स्पर्धेचे उदघाटन हिंगोली जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ऍड.शिवशंकर वाबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष ऍड.रमेश शिंदे, पदाधिकारी पवन जाधव, सुजय देशमुख, सुमित कांबळे, ऍड.स्वप्नील इंगळे, सुरज वडकुते, ज्ञानेश्वर लोंढे, नितीन इंगळे, मार्गदर्शक भुषण देशमुख, कल्याण देशमुख, ऍड.अमोल जाधव, अनिल नैनवाणी, दिपक नैनवाणी, दिपक अग्रवाल, ऍड.मिलिंद कांबळे, ऍड.अजय देशमुख, सचिन जैस्वाल, ओम नेनवाणी, महावीर बडेरा, किशोर काकडे, विजय साहु आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेतील विजेत्यांना शिवजयंतीच्या दिवशी दि.१९ फेब्रुवारी रोजी ट्राफी व बक्षीस वकील संघातर्फे देण्यात येईल.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा