माता रमाई जन्मोत्सव उत्साहात संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
सध्या देशात मनुवादी विचारसरणी डोके वर काढत असून त्यांच्यापासून संविधानाला धोका निर्माण झाला असून, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लिखित संविधान वाचवण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत दोन आंबेडकर अकोल्यातून बाळासाहेब तर अमरावतीतून आनंदराज संसदेत पाठवण्याचे आव्हान मार्गदर्शक म्हणून पूज्य भंते पय्यबोधी बोलत होते.
दरम्यान शहरातील संविधान कॉर्नर येथे रिपब्लिकन सेनेच्या वतीने दि .२४ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६ वाजता माता रमाई जयंती महोत्सवानिमित्त भीमगीतांचा महाजलसा व आंबेडकरी चळवळीतील नेत्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
सुरवातीला महापुरुषांच्या व महामातांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.महोत्सवाचे उदघाटन रिपब्लीकन सेना प्रदेश उपाध्यक्ष लोकनेते विजय वाकोडे यांच्या हस्ते करण्यात आले तर अध्यक्षस्थानी युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे होते. स्वागताध्यक्ष प्रीतम सरकते यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
यावेळी आंबेडकरी चळवळीतील लढाऊ ज्येष्ठ नेते गणेशराव पडघन ,मधुकर मांजरमकर ,जी.डी मुळे ,जयाजी पाईकराव ,दिवाकर माने ,मिलिंद मोरे ,ऍड.साहेबराव शिरसाठ ,माणिकराव इंगळे ,शांताबाई भालेराव ,राधिकाबाई चिंचोलकर आदींचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वसीम देशमुख,मिलिंद उबाळे ,भन्ते संघप्रिय ,जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे ,आकाश दातार ,बाळू गायकवाड ,बाळासाहेब पाईकराव ,दिनकर उबाळे ,राजू उबाळे ,संजय वाकळे ,धम्मपाल काळे ,सुरज वाघमारे ,विनोद
थोरात ,भारत गधडने ,राजू सरतापे , नितीन गव्हाणे, विनोद जोगदंड, विनोद साळवे, आदी उपस्थित होते .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा नेते विकिभाऊ भालेराव, जिल्हा नेते राहुल भाऊ पुंडगे, युवा जिल्हाप्रमुख विकीभाऊ काशिदे, युवा शहराध्यक्ष किशोर भाऊ वाघमारे, युवा ता. अध्यक्ष अविनाश कांबळे, ता. महासचिव कपिल भोकरे, संघपाल कांबळे, अमोल भोकरे, सोनु भोकरे , स्वप्नील पुंडगे इ. परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जिल्हा प्रवक्ते समाधान खंदारे यांनी केले तर आभार भीमराव इंगोले यांनी मानले.
भिमशाहिर मेघानंद जाधव व विपीन तातड यांनी भिमगिंताचा जागर करुंन नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला मोठ्या संख्येने महिला व पुरुषांची उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा