maharashtra day, workers day, shivshahi news,

मोबाईलवर मेसेज आणि पाठलाग करून युवतीचा विनयभंग

आरोपी युवकांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल 
A girl was molested by sending a message on a mobile phone , buldhana , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील एका वस्तीत राहणाऱ्या एका युवतीच्या मोबाईलवर मेसेज आणि पाठलाग करून विनयभंग करण्यात आला. ही घटना गुरूवारी सकाळी उजेडात आली. याप्रकरणी पोलीसांनी आरोपी युवकांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, शहरातील एका वस्तीतील युवती घरकाम करते.

 दरम्यान, खामगाव जवळील एका गावातील युवक तिचा सतत पाठलाग करतो. तिला मोबाईलवर मेसेज पाठवितो. ही बाब तिने बुधवारी तिच्या घरच्यांना सांगितली. त्यानंतर शहर पोलीसांनी संबंधित युवका विरोधात भादंवि कलम ४५४ ड, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !