जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत केली संयुक्त पाहणी
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
हिंगोली दि. 27 : मा.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सावत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आज येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात असलेल्या ईव्हीएम स्ट्राँग रुम व मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत संयुक्त स्थळ पाहणी केली . यावेळी त्यांनी स्ट्राँग रुम, मतमोजणी केंद्राची तपासणी करुन उपलब्ध सोई सुविधाची माहिती घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, उपजिल्हाधिकारी स्पप्नील मोरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता, भारत संचार निगमचे उपविभागीय अभियंता, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य आदी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा