maharashtra day, workers day, shivshahi news,

केबल टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे अपघातात वाढ..

मोबाइल कंपनीने बिना परवाना खोदकाम केले

Increase in accidents due to potholes , Sindkhedaraja , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, आरिफ शेख/सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी 
सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेडां ते मलकापूर पांग्रा रस्त्यावर मोबाइल कंपनीने बिना परवाना खोदकाम करून ओएफसी केबल टाकण्यासाठी खोदलेले खड्डे तक्रारी वाढल्याने जैसे थे आहेत. खोदलेले खड्डे आणि त्याचा मुरूम रस्त्याच्या मधोमध पडल्याने या ठिकाणी छोटे-मोठे अपघात दररोज होत असल्यामुळे सदर खड्डे तत्काळ बुजवावे आणि रस्ता मोकळा करावा, अशी मागणी वाहनधारक करीत आहेत.
मलकापूर पांग्रा ते साखरखेर्डा या रस्त्यावर कोणतीही परवानगी न घेता मोबाइल कंपनीने रस्त्याच्या बाजूस डांबरीकरणाला लागून सुलुप खोदून त्या ठिकाणी केबल टाकले आहे. मात्र,
परवानगी नसल्याने तक्रार केल्याने अखेर हे काम अर्धवट सोडून जेसीबी चालक आणि ठेकेदार पसार झाले. त्यामुळे या ठिकाणी खोदलेल्या खड्याचा मुरूम रस्त्यावरच पडला आहे. त्यामुळे या ठिकाणी छोटे-मोठे अपघात 
दररोज होतात. रात्रीच्या वेळेस या ठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तत्काळ खड्डे बुजवावे आणि रस्ता मोकळा करावा, अशी मागणी पादचारी आणि वाहनधारक करीत आहेत.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !