वीज ग्राहकांना व शेतकऱ्यांना दिलासा
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली (जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य)
हिंगोली येथे 26 जानेवारी रोजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते 250 नवीन डीपी लोकार्पण करण्यात आले. हिंगोली जिल्हा वार्षिक योजना साधारण सन 2022-2023 अंतर्गत महावितरण हिंगोली मंडळ कार्यालयास 100 के व्ही ए श्रमतेचे नंदरुस्त विघुत रोहित्र त्वरित बदलविण्यासाठी रू4.32 कोटी निधी वितरित करण्यात आला होता. त्यानुसार महावितरण मुख्य कार्यालयातून हिंगोली मंडळ कार्यालया 100 के व्ही ए श्रमतेचे 250 विघुत रोहित्र प्राप्त झाले .
असून गणतंत्र कार्यक्रमाच्या प्रसंगी 26 जानेवारी रोजी हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संत नामदेव कवायंत मैदान हिंगोली येथे लोकार्पण सोहळा करण्यात आला यावेळी आमदार तानाजी मुटकुळे संतोष बांगर हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापलकर हिंगोली पोलीस अधीक्षक जी श्रीधर जिल्हा परिषद चे मुख्याधिकारी संजय संजय दैने हिंगोली नगर परिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे महावितरण कंपनी अधीक्षक अभियंता राजे सिंग चव्हाण कार्यकारी अभियंता सुरेंद्र मुंगारे यांच्यासह महावितरण अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा