सकल ब्राह्मण समाजाची पोलीस निरीक्षकाकडे निवेदनाद्वारे मागणी
शिवशाही वृत्तसेवा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली - ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपवून टाकू आणि आक्षेपार्ह अशी चिथावणीखोर भाषा वापरून खालच्या पातळीवर बोलणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने बुधवारी (ता.२८) निवेदनाद्वारे शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे.
पोलीस निरीक्षक यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले की,
२६ फेब्रुवारी रोजी यूट्यूब पाहत असताना त्यात एका गावरान विश्लेषक या चॅनलवर मराठा आरक्षण आंदोलनातील काही व्यक्तीच्या प्रतिक्रिया घेतल्या जात होत्या. या व्हिडिओत एका व्यक्तीने अख्खा ब्राह्मण समाज तीन मिनिटात संपवून टाकू असे आक्षेपार्ह विधान केल्याने ब्राह्मण समाजात भीतीचे वातावरण निर्माण होईल, आणि ब्राह्मण समाजाच्या कत्तली करण्याचे षडयंत्र रचले आहे.त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मराठा समाजाच्या आरक्षणाला ब्राह्मण समाजाने कधीही विरोध केला नसताना ,परंतु हा व्यक्ती ब्राह्मण समाजाची बदनामी करीत आहे. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्या दोषी व्यक्तीचा शोध घेऊन यातील सहभागी व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
निवेदनावर यावेळी सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने केशव दुबे यांच्यासोबत सुनील जामकर, राजेश मोकाटे, प्रणव पांडे, अभय जोशी, लक्ष्मीकांत पाठक, विश्वेश्वर धर्माधिकारी, चंद्रकांत वैद्य, शशिकांत देशमुख , श्याम शेवाळकर, राकेश भट्ट , प्रवीण भट्ट , गणेश पहिणकर , देवदत्त पेंडके, धनंजय कुलकर्णी, धीरज शर्मा, शुभम पारीख, प्रद्युम्न गिरीकर, धोंडीराज पाठक, मकरंद बांगर, प्रदीप धडवई, दुर्गा दास साकले , राहुल मांडवीय, प्रथमेश जामकर , आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा