maharashtra day, workers day, shivshahi news,

आठवडा भरात ६५हजार शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार ६८कोटीची भरपाई

जियारती साठी १६हजार ६०० तर बागायती साठी २७हजार 
Farmers will get compensation , Sindkhedaraja , shivshahi news.


आरिफ शेख सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी शिवशाही न्यूज
 तालुक्यात गारपीट, अतिवृष्टी, वादळ अशा आस्मानी संकटांच्या मालिकेत पिचून
निघालेल्याा व शासनाच्या  मदतीकडे आस लावून बसलेल्या बळीराजाची नुकसान भरपाईची प्रतीक्षा आता संपली आहे. ६५ हजार शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेली ६८ कोटीची नुकसानभरपाई येत्या आठवडाभरात बँकखात्यात जमा होणार आहे. जिरायतीसाठी हेक्टरी १६ हजार ६००, बागायतीकरिता हेक्टरी २७ हजार रुपयांचे अर्थ साहा मिळणार आहे.
२६ नोव्हेंबर ते१डिसेंबर २०२३ वा कालावधीत राजा तालुक्यात अतिवृष्टी, अवेळी पाऊस पडला. सोयाबीन, कापूस व अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले, आर्थिकदृष्ट्या शेतकरी खचून गेला, अतिवृष्टी होऊनदेखील मिळण्यास अनुदान सरकारकडून मोठा उशीर होत होता. पीकविम्याचा सर्वे करूनही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापपर्यंत झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्याला मदत प्राप्त शासन करते की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांना १ डिसेंबर पडला होता. मात्र, लवकरच सिंदखेड लोकसभा निवडणुकीची गारपीट, आचारसंहिता लागणार असल्याने निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सरकारने सिंदखेड राजा तालुक्यासाठी अतिवृष्टीचे ६८ कोटी २९ लाख रुपये दिले आहेत. त्यामुळे तालुक्यातील ६४ हजार ५६३ शेतकन्यांना सरसकट मदत मिळणार आहे. तालुक्यात लागवडीखालील ४७ हजार १५ हेक्टर क्षेत्र आहे. या शेतकऱ्याच्या खात्यावर ऑनलाइन सरसकट मदत जमा होणार आहे.
अशी होणार मदत जिरायती क्षेत्रासाठी १३ हजार ६०० रुपये प्रतिहेक्टरी मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त तीन हेक्टर क्षेत्राची मर्यादा आहे. तर बागायती क्षेत्रासाठी २७ हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई मिळणार आहे. त्याची मर्यादादेखील तीन हेक्टर क्षेत्रापर्यंत आहे. अनुदानाची रक्कम कपात न करण्याचे आदेश शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले की त्यातील रक्कम कर्जखात्यात जमा करू नये तसेच कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावू नये, अनुदानाची रक्कम बँकेने कपात करू नये, अशी सक्त ताकीद तहसीलदार सचिन जयस्वाल यांनी बँकांना दिली आहे.
खातेक्रमांक अपडेट असणे गरजेचे मदतीचे पैसे प्राप्त झाले असून, तलाठ्याकडून याद्या घेणे सुरू आहे. त्यांच्या खात्यात तत्काळ पैसे पड़ावे, यासाठी बुद्धस्तरावर काम सुरू आहे. रक्कम खात्यात जमा होण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला खाते क्रमांक अपडेट करून आधार लिंकिंग केलेले असावे, ज्यांचे खाते क्रमांक अपडेट असतील त्यांच्या खात्यावर लगेच अनुदानाचे पैसे जमा होतील. मात्र, ज्यांचे नसेल त्यांनी तत्काळ आपले खाते अपडेट करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार सचिन जयस्वाल यांनी केले आहे, ज्यांच्या खात्यावर पैसे आले नाहीत किंवा ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी असतील त्यांनी या विभागाचे महसूल सहायक हिरामण बागूल यांच्याशी संपर्क साधावा .

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !