युवा व्याख्याते आकाश वडघुले यांचे प्रतिपादन
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर तालुका प्रतिनिधी, फैजल पठाण
छत्रपती शिवरायांचे दैदीप्यमान व्यक्तिमत्व आजच्या काळात युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध युवा व्याख्याते आकाश वडघुले यांनी केले.
तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ आणि शकुंतला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने साहेबराव शंकरराव ढमढेरे यांच्या स्मृती व्याख्यानमालेत बोलताना वडघुले म्हणाले की, छत्रपतींनी आपल्या सर्वांच्या नसानसात स्वाभिमान पेरला हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श व्यक्तिमत्त्वातील बारकावे आजच्या युवकांनी समजून घेणे काळाची गरज आहे स्वाभिमान आणि मेहनत काय असते सर्वसामान्य जनता आणि स्वराज्य विषयी आत्मीयता कशी असावी.
याविषयीचा आदर्श वस्तू पाठ आपल्याला शिवरायांनी घालून दिला आहे. राष्ट्रमाता जिजाऊ यांनी आदर्श असा संस्कार शिवरायांना दिला, त्यामुळे एक सुसंस्कारित आदर्श असा राजा शिवरायांच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाला हे आपलं भाग्य असल्याचे श्री आकाश वडघुले यांनी याप्रसंगी सांगितले. शिवरायांचा स्वाभिमान, शिवरायांची आदर्श अशी राजनीती, रयते प्रती त्यांना असणारा जिव्हाळा, दृष्टांचा संहार करणारे कणखर व्यक्तिमत्व ही शिवरायांची ओळख नव्या युगातील युवकांसाठी सातत्याने आशादायी असल्याचेही त्यांनी सांगितले छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी, त्यांचा करारी बाणा आणि शत्रूच्या उरात धडकी भरवणारी त्यांची कारकीर्द यामुळे कणखर आणि स्वाभिमानी महाराष्ट्र घडवू शकला असे त्यांनी वेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ आणि विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेश बापू ढमढेरे होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक नवले डॉक्टर पराग चौधरी डॉक्टर दत्तात्रय वाबळे डॉक्टर प्रमोद पाटील तसेच व्याख्यानमालेचे समन्वयक डॉक्टर पद्माकर गोरे इत्यादी उपस्थित होते तर प्रस्ताविक प्राध्यापक डॉक्टर पद्माकर गोरे यांनी केले व सूत्रसंचालन दत्तात्रय कारंडे यांनी केले तर आभार रवींद्र भगत यांनी मांडले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा