राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वराज्य सप्ताहा राबवला.
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, चंद्रकांत वैद्य
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने रयतेचे राज्य जिजाऊ शिवबांचे, स्वराज्य सप्ताहा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वराज्य सप्ताहा राबवून महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान यांच्या शी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जोडला गेला आहे. हे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू करण्यात यावे. यासाठी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी यांनी स्वराज्य सप्ताहा करावा. असे पक्ष कार्यालयाकडून आदेश देण्यात आले आहेत.
स्वराज्य सप्ताहा अंतर्गत आपल्या मतदारसंघातील चौका चौकात पताका, ध्वज लावणे, गडकिल्ल्यांच्या ठिकाणी सेल्फी पाँइंट करणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पोवाडे, गीत सादर करणे, त्याच प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला पदाधिकारी यांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जीवनावरील पोवाडे गीत सादर करणे, गड किल्ले यांच्या परिसरात स्वच्छता मोहीम करण्यात यावी. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात यावी. सबका राजा, शिवाजी राजा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात यावे. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सेलचे नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष विश्वनाथ घुगे यांनी केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा