विजय करवंदे यांची संयोजक पदी नियुक्ती
शिवशाही वृत्तसेवा, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य
हिंगोली - भारतीय जन विकास आघाडीच्या मराठवाडा विभागाच्या संयोजक पदी येथील विजय करवंदे यांची भाऊसाहेब बावणे यांनी एका पत्राद्वारे नियुक्ती केली आहे.
विजय करवंदे यांनी भारतीय जन सम्राट पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात कामाची उभारणी केली आहे. तसेच त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत तिसऱ्या राजकीय आघाडी म्हणून ओळख असलेल्या भारतीय जन विकास आघाडीच्या मराठवाडा विभाग संयोजक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. आता पक्ष संघटन बांधणीसाठी मोठी जबाबदारी सोपविण्यात आल्याने ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार असल्याचे विजय करवंदे यांनी सांगितले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा