वादा बरोबर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे
बुलढाणा शहरातील तेलगू नगर येथे कचरा टाकल्याच्या कारणावरून वादातून शेजाऱ्यांमध्ये वाद होऊन शिवीगाळ केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तेलगू नगरातील मीना साठे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे शेजारी रिझवान पटेल , मनीषा पाटील , इम्रान पटेल,यांनी कचऱ्याच्या कारणावरून वाद घातला शिवीगाळ केली नंतर मनीष पटेल याने दगडफेक केली त्यानंतर मीना साठे यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा