maharashtra day, workers day, shivshahi news,

मलकापूर पांग्रा येथे भर दिवसा धाडसी चोरी - बारा तोळे सोने व रोख रक्कम लंपास

मालक दीपक त्र्यंबक उगले यांच्या राहत्या घरी चोरी
Theft in broad daylight, gold and cash looted, buldhana, sindkhedraja, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेड राजातालुक्यातील मलकापूर पांगरा येथे भर दिवसा दुपारी तीन वाजेच्या सुमारास येथील गजबजलेल्या साईनगर येथे लक्ष्मण नारायण घुगे व ई ग्राहक सेवा केंद्र मालक दीपक त्र्यंबक उगले यांच्या राहत्या घरी चोरी झाल्याचे निदर्शनास आले सदर घटना घडतात साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत बीड जमदार निवृत्ती पोफळे व बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले मात्र तोपर्यंत चोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला होता वरील सविस्तर वृत्त असे की आज 29 जानेवारीला दपारी तीन ते चार दरम्यान घरात कोणी नसल्याचे बघून घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत कपाटातील लक्ष्मण नारायण घुगे यांच्या घरातील एक पोत अंदाजे तीन तोळे घरा जवळ शाळेतील मुले खेळत असताना घरात प्रवेश करून लंपास केले तर समोरच राहणारे ग्राहक सेवा केंद्राचे मालक दीपक त्र्यंबक उगले यांच्या घराचे कुलूप तोडून दहा ते बारा तोडे सोने व नगद 43 हजार रुपये
अंदाजी किंमत सात लाख रुपये असा एवस लंपास केला घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत बोट जमदार निवृत्ती पोफळे व स्थानिक गुन्हे शाखेचे सचिन कानडे दीपक वायाळ मनोज खरडे पुरुषोत्तम आघाव यांनी घटनास्थळी आणि करत चोरांचा शोध घेत आहे तर दुपारी एक वाजून 23 मिनिटांनी आगेफळ येथील गोपाल देविदास वोल्टे यांच्या घरात शिरून साडेपाच तोळे सोने व दहा हजार नगद घेऊन मलकापूर पांग्राकडे पोबारा केल्याचे येथे तपास करीत असताना
निदर्शनास आले मात्र वृत्त लिहेपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी तसेच ठाणेदार स्वप्निल नाईक व बीट जमादार निवृत्ती पोफळे हे पुढील तपास करीत आहे दिवसा धाडसी चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे सदर तिन्ही ठिकाणी चोरी करून चोरट्यांनी लगबग बारा ते पंधरा लाखाच्या जवळपास मुद्देमाल लंपास केल्याचे उपस्थितांकडून समजते मात्र पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवीत असल्याचे समजते.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !