प्रजासत्ताक दिनी गावात भव्य दिव्य स्वागत
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील मौजे कोकलेगांव या गावच्या पोलीस पाटील पदी सौ.सुनिता राजपल्ले यांची निवड झाल्याची निवड यादी उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी जाहीर केले आहे.
बिलोली उपविभागिय नायगांव तालुक्यातील सर्व गावच्या पोलीस पाटील पदाची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. सदरील निवड प्रक्रियेत कोकलेगांव गावचे पोलीस पाटील पद हे इतर मागास संवर्ग (OBC)महिलांसाठी राखीव होते, या पदासाठी गावातून आनेकानी अर्ज दाखल करून नशीब आजमावले पण .त्यापैकी चार उमेदवार हे लेखी परीक्षेत पात्र झाले होते तर फक्त एकमेव उमेदवार सौ.सुनिता राजपल्ले हे मुलाखतीत पात्र झाल्या त्यामुळे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी सौ.सुनिता राजपल्ले यांची मुलाखत घेऊन कोकलेगांव गावच्या पोलीस पाटील पदी सौ.सुनिता राजपल्ले यांची गुनानुक्रमे निवड करण्यात आल्याची निवड यादी जाहीर केले आहे.
या निवडीबद्दल सरचिटणीस धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य तथा ग्रामपंचायत सदस्य मा.बालाजी पाटील नारे सर कोकलेगाव गावचे सरपंच हाणमंतराव पा.मिरकुटे अॅड.ज्ञानेश्र्वर पाटील मोरे,बाबु देशमुख,लव्हाजी पा.नारे,यादवराव पा.नारे ग्रा.प.सदस्य नारे प्रविण पा,प्रकाश पा.मिरकुटे,हंगरगे साहेब,सुभाष पा.घारके,माणिक पा.घारके,मोहन नारे,राजेश नारे,ग्रामपंचायत सदस्य गगांधर झगडे,माधव मिरकुटे सर,बापुराव पाटील मोरे,गोविंद मेने आदीसह कोकलेगांव गावातील नागरिकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा