खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
शिवसेना नेते तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नातून महिला बचत गटांना सक्षम व स्पर्धात्मक बनविण्याच्या अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील महिला बचत गटासाठी विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या केंद्राद्वारे महिला बचत गटात उत्पादित केलेल्या वस्तू विक्री करण्यात येणार असून त्यामुळे महिला बचत गटाच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यातून महिला बचत गटाची उत्पन्न वाढल्यामुळे या महिला सक्षम व समृद्ध होतील असा हेतू ठेवून हे विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे.
सिंदखेड राजा येथे नव्यानेच उभारण्यात आलेल्या तालुकास्तरीय विक्री केंद्राचा भव्य उदघाटन सोहळा खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाला आहे. खासदार प्रताप जाधव यांनी सर्व महिला बचत गटाच्या स्टॉलवर भेटी देऊन त्यांनी उत्पादित केलेल्या मालाचे आणि बचत गटाची माहिती घेतली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा