विद्यार्थ्यांना दिले गटशेतीचे व सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण
शिवशाही वृत्तसेवा , जिल्हा प्रतिनिधी वैजापूर अनिल सूर्यवंशी
पाणी फाऊंडेशन अंतर्गत फार्मर कप स्पर्धा चालू आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन आपला उत्पादन खर्च कमी करून आपले उत्पन्न वाढविण्यासाठी जैविक पद्धतीने किड नियंत्रण कसे, कधी,केव्हा करावे याची सविस्तर माहिती पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षक श्री रविंद्र पोमणे सर यांनी दिली.
जिल्हा समन्वयक प्रल्हाद अडसूळ यांनी मागील २०१८/१९मधील अनुभव व तालुक्यातील पाणी फाऊंडेशने व गावकऱ्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा विद्यार्थ्या पुढे सादर केला यावेळी कॉलेजचे प्रिन्सिपल बहुरे जी के, प्राध्यापक शेळके सर, प्राध्यापक के ए भालेराव सर, प्राध्यापक ए गावंडे सर, मास्टर ट्रेनर राजेश हिवरे सर, तालुका समन्वयक बिभीषण भोईटे सर, बळेगाव येथील साई शेतकरी गटाचे सदस्य अनिल सूर्यवंशी यांची उपस्थिती होती तसेच विद्यार्थी पण बहु संख्येने उपस्थित होते
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा