नागरिकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी हिंगोली चंद्रकांत वैद्य
हिंगोली ), दि. 04 : जिल्ह्यातील नागरिकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात इव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र सुरु करण्यात आलेले आहे. या प्रात्यक्षिक केंद्रावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी आपले मत नोंदवून मतदान झाल्याची खात्री केली. तसेच ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीनची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर उपस्थित हाते.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी छंदक लोखंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनीही या प्रात्यक्षिक केंद्रावर आपले मत नोंदवून माहिती जाणून घेतली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा